दत्ता मेघे अभिमत विद्यापीठात गणेशोत्सवाचे आयोजन. उद्या सावंगी येथे सांस्कृतिक महोत्सवाचा श्रीगणेशा
ज्ञानविज्ञान प्रदर्शनी, सांस्कृतिक उपक्रम, आरोग्य शिबिरांची रेलचेल
वर्धा – सावंगी येथील दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाच्या सांस्कृतिक महोत्सवाचा आरंभ बुधवार, दि. २७ रोजी गणरायाच्या आगमनाने होणार आहे. सावंगीच्या शैक्षणिक परिसरात आयोजित या पर्यावरणपूरक गणेशोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, ज्ञानविज्ञान प्रदर्शनी, विविध आरोग्य शिबिरे आदींचे वैविध्यपूर्ण आयोजन नागरिकांसाठी करण्यात आले आहे.सावंगी येथे बुधवारी सकाळी १० वाजता कुलपती दत्ता मेघे आणि जिल्ह्याचे…