अविनाश नागदेवे जिल्हा प्रतिनिधी वर्धा
वर्धा : दिनांक 19 मार्च 2025 रोजी जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रम विकास भवन वर्धा येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अध्यक्षपदी सौ.वैशाली गजभिये जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच वर्धा श्री.विवेक दा.देशमुख सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर वर्धा श्री.संजय मसंद सदस्य जिल्हा ग्राहक निवारण आयोग वर्धा श्री.अनिल तोष्णीवाल सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग वर्धा श्री. सतिश देशमुख अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत वर्धा श्री.किशोर मुटे अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा शाखा वर्धा श्री अनिल मिश्रा संघटक अखिल भारतीय ग्राहक पंचायत वर्धा श्री विनोद पोटे सचिव अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा वर्धा सुरेश पट्टेवार अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक पंचायत तालुका वर्धा तसेच प्रमुख वक्ते श्री. अजय भोयर सचिव अखिल भारतीय ग्राहक कल्याण विदर्भ शाखा श्री अजय साबळे प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा श्री चंद्रशेखर वानखेडे धान्य खरेदी अधिकारी वर्धा व श्रीमती मनीषा माजरखेडे निरीक्षण अधिकारी वर्धा यांनी स्वामी विवेकानंद यांच्या फोटोला माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर जागतिक ग्राहक दिनाचा कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून सुरवातीला श्रीमती मुटे यांनी ग्राहक दिना संबंधी गीत गायन करण्यात आले यानंतर कार्यक्रमाला लाभलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे संचालक श्रीमती सुष्मिता आखाडे सह संघटक मंत्री वर्धा प्रास्ताविक श्रीमती मनीषा माजरखेडे यांनी केले सदर कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे यांनी राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या विषयावर मनोगत व्यक्त केले व ग्राहकांमध्ये जनजागृती करीता प्रोत्साहन करण्यात आले कार्यक्रमाचे शेवटी श्री किशोर मुटे यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रम संपला असे जाहीर केले या कार्यक्रमाला वर्धा शहरातील सर्व धान्य दुकानदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

