वर्धा: महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे अध्यक्ष,खासदार शिवसेना नेते अरविंद सावंत, सरचिटणीस हिरेन रेडकर कार्याध्यक्ष प्रदीप धुरंदर साहेब यांचे आदेशाने व राज्य उपाध्यक्ष सुशीलजी भुते व नागपूर विभागाचे विभागीय सचिव विलास मते यांच्या मार्गदर्शनात दिनांक 10/3/2025 रोजी महाराष्ट्र एसटी कामगार सेना वर्धा विभागाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. या कार्यकारणी प्रामुख्याने प्रमुख म्हणून विभागीय अध्यक्ष पदावर शिवसेना वर्धा विधानसभा प्रमुख निहाल पांडे यांची नियुक्ती बहुमताने करण्यात आली. तसेच वर्धा विभागाचे विभागीय सचिव पदावर संतोष देविदासराव लोकडे तळेगाव आगार व विभागाचे कार्याध्यक्ष शप्रशांत वासुदेवराव लोखंडे वर्धा विभाग यांच्या उपस्थिती महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निहाल पांडे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे, शिवसेना नेते एस टी कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत साहेब यांचे प्रामुख्याने आभार मानले असून एसटी कामगारांच्या प्रश्नासाठी ताकतीने लढण्याची तयारी दाखवली आहे. या वेळी प्रमुख उपस्थिती म्हणून माजी प्रादेशिक सचिव वासुदेवराव जाधव, एसटी कामगार सेना वर्धा माजी अध्यक्ष दिपकजी पाठक,सचिन जगदले,राजेंद्र गांडोले,मानकरजी, टेकामजी इत्यादी प्रमुख उपस्थिती मध्ये असलेले मान्यवरांनी नवनियुक्त पदाधिकारी यांचा अभिनंदन केला आहे.
