जिल्ह्यातील आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी प्रयत्न करणार – पालकमंत्री डॉ. पंकज भोयर

कर्करोग डायग्नोस्टीक व्हॅन, डे केअर केमोथेरपी सेंटरचे लोकार्पण
डिजिटल हॅन्ड केअर एक्सरे मशीनचे उद्घाटन



वर्धा दि. 9 :- प्रत्येक नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे व त्यांना योग्य वेळेत चांगला व मोफत उपचार मिळावा यासाठी शासन प्रयत्न करीत करीत आहे. या डायग्नोस्टीक व्हॅनच्या माध्यमातून कर्करोगाचे निदान करुन रुग्णांवर वेळेत उपचार करण्यास आरोग्य विभागास मोठी मदत होईल असे प्रतिपादन राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन, डे केअर कमोथेरपी सेंटर व डिजिटल हॅन्ड एक्सरे मशीनच्या लोकार्पण सोहळ्यात केले.

आज सामान्य रुग्णालय येथे कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन, डे केअर कमोथेरपी सेंटर व डिजिटल हॅन्ड एक्सरे मशीनच्या लोकार्पण सोह्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आरोग्य सेवा नागपूरचे उपसंचालक डॉ. शशीकांत शंभरकर, सहसंचालक डॉ. गवई, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुमंत वाघ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रा.ज. पराडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नलीनी विखे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनील वानखेडे, डॉ. वंजारी आदी उपस्थित होते.

खाजगी रुग्णालयाप्रमाणे शासकीय रुग्णालयात सुध्दा रुग्णांना आधुनिक उपचाराच्या सुविधा मिळवून देण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न करणार असल्याचे श्री भोयर यांनी सांगून यासाठी आरोग्य विभागांनी रुग्णालय बळकटी करणासाठी शासन प्रस्ताव सादर करावे. रुग्णांना प्रसन्न वाटेल अशी सुविधा  आरोग्य विभागांनी निर्माण करुन द्यावी. केंद्र शासनाच्या आयुष्मान योजनेंतर्गत 5 लक्ष रुपयापर्यंत उपचाराची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासाठी जिल्ह्यातील जास्तीत नागरिकांनी आपले आयुष्मान कार्ड काढून घेण्याचे आवाहन यावेळी डॉ. पंकज भोयर यांनी केले.

कर्करोग डायग्नोस्टीक व्हॅनचे उद्घाटन

आताच्या काळात असंसर्गजन्य रोगाचे प्रमाण वाढले असून कर्करोग, उच्चदाब, मधुमेह यासारख्या रोगाच्या रुग्णात मोठी वाढ झालेली असून मृत्युचे प्रमाण वाढलेले आहे. राज्य शासनाकडून नागपूर विभागाला वर्धा करीता कॅन्सर डायग्नोस्टीक व्हॅन उपलब्ध झाली असून या व्हॅनमुळे ककरोगाचे निदान करण्यात मोठी मदत होईल. असे डॉ. शशीकांत शंभरकर यावेळी म्हणाले.

कार्यक्रमाला सामान्य रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

डिजिटल हॅन्ड केअर एक्सरे मशीनचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FOLLOW US

Live Cricket

POll

What does "money" mean to you?
  • Add your answer

TRENDING NEWS

Advertisement

GOLD & SILVER PRICE

Rashifal