बालिकेवरील अत्याचार प्रकरणाची सर्व अंगाने सखोल
चौकशी व सबळ पुरावे जमा करा                                                                                         – पालकमंत्री डॉ.पंकज भोयर



Ø  रोठा अत्याचार प्रकरणी पालकमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक

Ø  जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक व एसआयटी कडून घेतला आढावा

वर्धा, दि.22 (जिमाका) : रोठा येथील बालिकेवर अत्याचार प्रकरणाचा पालकमंत्री तथा गृह राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी आज आढावा घेतला. सदर प्रकरण अतिशय गंभीर आहे. यातील दोषी आरोपीवर कठोरात कठोर कारवाईसाठी प्रकरणाची सर्व अंगाने सखोल चौकशी करा, सबळ पुरावे जमा करा, अशा सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत दिल्या.

रोठा येथील बालिकेवर अत्याचार व हत्या प्रकरणाचा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी वान्मथी सी, पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिस उप अधीक्षक सुनिल महाडीक यांच्या प्रमुखतेत नेमण्यात विशेष तपास पथकाकडून सविस्तर आढावा घेतला. यावेळी आमदार मनीषा कायंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश खताळे यांच्यासह पोलिस, महिला व बालविकास, आदिवासी, शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी एसआयटी प्रमुख श्री.महाडीक यांच्याकडून सर्व घटनाक्रम समजून घेतला. आरोपीने सदर मुलीच्या घरात प्रवेश केल्यापासून तर तो बाहेर पडेपर्यंत सर्व घटनांची तपासात बारकाईने नोंद केली गेली पाहिजे. सदर प्रकरणी काही सीसीटीव्ही फुटेज मिळू शकते का ते बघा. जास्तीत जास्त पुरावे जमा करा. प्रकरणात शासनाच्या वतीने जोरकस बाजू मांडण्यासाठी विशेष नामवंत वकिलाची नेमणूक करण्यासाठी चर्चा सुरु आहे. प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लावून आरोपीस कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न असल्याचे पालकमंत्री म्हणाले.

बालिकेच्या कुटुंबियांना शासनाकडून कोणत्या सुविधा उपलब्ध करून देता येईल, याबाबतही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. कुटुंबातील बालिकांना शाळेत प्रवेश मिळवून देण्यात यावा. मनोधैर्य योजना व आदिवासी विकास विभागाच्या न्युक्लिअस बजेटमधून जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्यासाठी प्रस्ताव सादर करा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रस्तावांचा वैयक्तिक पाठपुरावा करावा. आदिवासी विकास विभागाच्या शबरी योजनेतून शेतजमीन उपलब्ध करुन देण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील संबंधित तालुक्यातील तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांशी समन्वय साधून कारवाई करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. कुटुंबातील मुलींचे शिक्षण व त्यांच्या भविष्यासाठी त्यांना कोणत्या योजनांचा लाभ देता येईल, याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे आदिवासी विकास विभागाला सांगितले.

पोलिस उप अधीक्षकांच्या प्रमुखतेत 15 जणांची एसआयटी

रोठा येथील प्रकरणाची जलदगतीने आणि सखोल चौकशी करण्यासाठी पोलिस उप अधीक्षक सुनिल महाडीक यांच्या प्रमुखतेत 15 पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे विशेष तपासणी पथक गठीत करण्यात आले आहे. या पथकात महिला पोलिस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. यावेळी तपास पथकातील अधिकाऱ्यांना पालकमंत्र्यांनी आवश्यक सूचना केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FOLLOW US

Live Cricket

POll

What does "money" mean to you?
  • Add your answer

TRENDING NEWS

Advertisement

GOLD & SILVER PRICE

Rashifal