राज्यमंत्री याच्या जनता दरबार मध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यलयातील नियमांची पायमल्ली भस्ट्राचाराच्या बाबत तक्रार – आशिष सोनटक्के जिल्हाध्यक्ष भिम आर्मी

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा येथील शासन निर्णयाचे उल्लंघन होत असून वरिष्ठ अधिकारी यांचे कार्यालयावर नियंत्रण नसल्याने वेळोवेळी त्याबाबत सूचना त्याना दिल्या परंतु त्याचे लक्ष नसल्याने दिनांक 16 फेब्रुवारी 2026 राजी दुपारी 2:00 वाजता नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यलय येथे मा.डॉ पंकज भोयर साहेब राज्यमंत्री गृह ग्रामीण ,गृहनिर्माण, शालेय शिक्षण ,सहकार, खनिकर्म, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री वर्धा याच्या अध्यतेखाली जनता दरबार घेण्यात आला तेव्हा निवेदन सादर करत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय नवीन इमारत सालोड (हिरापूर )येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढला असून महसूल विभागानंतर सर्वात जास्त भ्रष्टाचार या RTO कार्यालयात होत असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहने ट्रक ,टिप्पर, हायवा ,क्षमतेपेक्षा जास्तची वाहतूक होत असून संबंधित अधिकारी न पकडण्यासाठी महिन्याकाठी प्रत्येक ट्रक चालक मालक यांच्याकडून पाच ते सात हजार रुपये अवैध रक्कम एजंट व कार्यलयाच्या काही कर्मचारी यांच्या मार्फत कार्ड सिस्टीम च्या माध्यमातून जमा करतात, व जे चालक मालक रक्कम देत नाहीत त्यांच्यावर मोठी कारवाई केली जाते , तसेच श्री मंगेश शिंदे (RTO) मोटार वाहन निरीक्षक यांनी आपल्या पदाचा नेहमीच चुकीचा वापर करत दबाव तंत्राचा वापर करीत शासनाच्या नियमाचे उल्लंघन करत असल्याचे वेळोवेळी आढळून आलेले आहे त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी.
वर्धा जिल्हात चार रस्ते अंतर जिल्हात प्रवेश करणारे असून यवतमाळ ,अमरावती, नागपूर चंद्रपूर ,मार्ग असून एकाही ठिकाणी शासन निर्णय प्रमाणे उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत वजन काटे लावण्यात आलेले नाही, त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड वाहनाची वाहतूक सतत सुरू असते .
त्याचबरोबर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे वाहन पासिंग करण्यासाठी जिल्हातील रोज हजारो वाहने कार्यालय येथे येतात त्याठिकाणी ही वजन काटा लावण्यात आला नाही, त्यामुळे अधिकारी काही रक्कम घेऊन वाहने पासिंग करतात.
3)उप प्रादेशिक परिवहन कार्यलया येथे परीक्षा किंवा डाव्हयविग लायसन्स काढण्यासाठी सामान्य जनता येत असते तर सदर ठिकाणी कोणतेही सीसीटीव्ही (CCTV) नसून एजंट व ड्रायव्हिंग लायसन शाळेच्या प्रत्येक शिकाऊ उमेदवाराला पास केले जाते ,त्यामुळे शिक्षित नसलेल्या व्यक्तींनाही लायसन देण्यात येते, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत चाललेले आहे वर्धा जिल्हात (1 जानेवारी 2025 ते 1 नोंहेबर 2025 या नऊ महिन्यात 618 अपघात झाले असून त्यामध्ये 316 लोकांच्या जीव गमवावा लागला व इतर अपंगत्व, व दुखापत झाली आहे त्याचा जबाबदार कोण ? .
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सालोड हिरापूर वर्धा येथे अधिकारी व कर्मचारी यांच्या दालनात एकही सीसीटीव्ही कमेरा नाही( त्यामुळे एजंट च्या अवैध पैशाची देवाण घेवाण होते व सामान्य जनतेला कार्यलयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे प्रत्येक अधिकारी व कर्मचारी याच्या दालनात cctv लावण्यात यावा.
5)उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे नियुक्त केलेले वाहन चालक कंत्राटी पद्धतीने असून त्यांची कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र ,पुरावा कार्यालयात उपलब्ध नसल्याने यांच्यामार्फतच एजंट म्हणून अवैध रक्कम, कार्ड सिस्टीम राबण्यात येते व रक्कम जमा केली जाते,
सदर वाहनचालक याची कोणतेही ओळखपत्र नसल्याची माहिती माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत प्राप्त झाले आहे,
6) सदर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे एकूण 16 अधिकारी असून एक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व नऊ (9) मोटार वाहन निरीक्षक असून पाच (5)सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आहे. कार्यालयात वेळोवेळी गेले असता एक किंवा दोन अधिकारी उपलब्ध असतात इतर अधिकारी यांचा कुठेही पत्ता नसतो व विचारपूस केल्यास राऊंड वर गेले,मिटींग ला गेले,बाहेर गेले, असे सांगण्यात येते व हालचाल रजिस्टर मागितल्यास उपलब्ध नाही म्हणून सांगण्यात येते त्यामुळे वेळोवेळी शासन निर्णयाची पायमल्ली होताना दिसून येते आहे.
संबंधित मागण्या मान्य करून सामान्य जनतेला न्याय द्यावा, अशी लेखी तक्रार राज्यमंत्री तथा पालकमंत्री याना आशिष सोनटक्के जिल्हाध्यक्ष भिम आर्मी संविधान रक्षक दल माहिती अधिकार कार्यकर्ता यांनी केली असून मागण्या मान्य न झाल्यास संघटनेच्या वतीने आंदोलनाची सुरुवात करण्यात येईल असे सांगितले.

जिल्हा प्रतिनिधी ……………….

आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून ही बातमी प्रसारित करण्यात यावी ही विनंती .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FOLLOW US

Live Cricket

POll

What does "money" mean to you?
  • Add your answer

TRENDING NEWS

Advertisement

GOLD & SILVER PRICE

Rashifal