पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उद्या जिल्ह्यात,गांव वस्ती संपर्क अभियानात होणार सहभागी

वर्धा. राज्याचे गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, खनिकर्म, गृहनिर्माण, सहकार व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर रविवार दि. 27 एप्रिल रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. पालकमंत्री श्री.भोयर भाजपाच्या गांव – वस्ती संपर्क अभियानात सहभागी होणार आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.जगतप्रकाश नड्डा व मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या निर्देशानुसार 26 व 27 एप्रिल रोजी गांव – वस्ती संपर्क अभियान राबविण्यात येत आहे.या अभियानातंर्गत पालकमंत्री डॉ. पंकज भोयर रविवारी सकाळी 8.30 वाजता प्रताप नगर येथील गजानन महाराज मंदिर परिसरात स्वच्छता अभियान, नागरिकांशी संवाद साधणार आहे.सकाळी 9.45 वाजता माजी नगरसेवक व भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रदीप ठाकरे यांच्या निवासस्थानी भेट, 10 वाजता भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश महल्ले, माधव कोटस्थाने यांच्या घरी भेट, सकाळी 10.30 वाजता श्रीनिवास कॉलोनी येथील शहर वर्धिनी आरोग्य केंद्रास भेट, 11 वाजता मंगेश मांगलेकर यांच्या निवासस्थानी मन की बात कार्यक्रमाला उपस्थित राहतील.यावेळी  भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सुनिल गफाट, शहर अध्यक्ष निलेश किटे व पदाधिकारी उपस्थित राहतील.याशिवाय भाजपा कार्यलयात बैठकीस उपस्थित राहतील. दुपारी 12 वाजता सावंगी येथील दत्ता मेघे ऑडिटोरीयम येथे आयोजित नृत्य स्पर्धा कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1 ते सांयकाळी 4 पर्यंत प्रशासकीय कामकाजासाठी वेळ राखीव राहिल. सायंकाळी 5 वाजता गांव – वस्ती संपर्क अभियानातंर्गत पालोती येथे जनता दरबार व संपर्क अभियानात सहभागी होतील. रात्री 9.30 वाजता नागपूर कडे प्रयान करतील.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FOLLOW US

Live Cricket

POll

What does "money" mean to you?
  • Add your answer

TRENDING NEWS

Advertisement

GOLD & SILVER PRICE

Rashifal