वर्धा दि. 11 : राज्याचे गृहनिर्माण, गृह (ग्रामिण), शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर दि.13 मार्च रोजी जिल्ह्याच्या दौ-यावर येत असून दि. 16 पर्यंत जिल्ह्यातील विविध कार्यक्रम व बैठकीस उपस्थित राहणार आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
दि. 13 मार्च रोजी सकाळी 9 वाजता नागपूर येथून वर्धेकडे प्रयाण करतील. सकाळी 9.30 वाजता सेलू तालुक्यातील सेलडोह येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन सोहळ्यास उपस्थिती. सकाळी 9.40 वाजता सेलडोह येथील महामार्ग ते अभय सोनटक्के यांचे घरापर्यंत सिमेंट रस्त्याच्या भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सकाळी 10.20 ते दुपारी 12 वाजता सेलू येथील कृषि कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमीपूजन व सेलू येथील विविध विकास कामाचे उद्घाटन व भूमीपुजन कार्यक्रमास उपस्थिती.
दुपारी 12.30 वाजता राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जाजू हॉस्पीटल जवळील जिल्हा लस भंडार येथील नवीन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 1 ते 1.45 वाजता जिल्हा न्यायालयामागील जुन्या जिल्हा उद्योग कार्यालयाच्या इमारतीजवळ महिला व बाल कल्याण विभागांतर्गत येणारे बालगृह व निरिक्षण गृहाचे भूमीपूजन कार्यक्रम व वन स्टॉप सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2 वाजता उपविभागीय कार्यालय जवळ स्थानिक विकास निधीतून देण्यात आलेल्या वॉटर एटीएम च्या लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 2.15 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवन येथे आयेाजित आशा मेळावा व प्रर्वतकांना टॅब वितरण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत बैठकीस उपस्थिती. सायंकाळी 4 वाजता पिपरी मेघे हनुमान टैकडी परिसराचे सौदर्यीकरण सिमेंट रस्त्याचे भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 5 वाजता सनदी लेखापाल संघटनेच्या समस्याबाबत विश्रामगृह येथे बैठकीस उपस्थिती.
दि. 14 मार्च रोजी सकाळी 7 वाजता मातेश्री सभागृह येथे आयोजित धुलीवंदन उत्सव मिरवणूकीस उपस्थिती. दि. 15 मार्च रोजी दुपारी 2 वाजता महात्मा पॅलेस येथे आयोजित पोलीस पाटील मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 3 ते 4 वाजता प्रशासकीय कामाकरिता राखीव. दुपारी 4.30 वाजता बोरगाव मेघे येथील सुपारी देवी मंदिर जवळील सुर्योदय प्रभाग संघ कार्यालय येथे बचत गट भवनाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. सायंहाभ् 5 वाजता सावंगी मेघे येथील विजय लॉन जवळील दामिनी सेवा संघ येथे बचत गट भवनच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती. सांयकाळी 7 वाजता हॉटेल सॅफरीन सेवाग्राम अनील पंडीत यांच्या जीवन गौरव कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी 7.30 वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथे आयोजित क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्यकरणा-या खेळाडूच्या सत्कार सोहळ्यास उपस्थिती.
दि. 16 मार्च रोजी सकाळी 11 वाजता एमआयडीसी येथे युनिसेल इंजिनिअरींग कंपनीच्या नवीन फॅक्टरीचे उद्घाटन समारंभास उपस्थिती. दुपारी 12 वाजता विकास भवन येथे आयोजित जनता दरबार कार्यक्रमास उपस्थिती. सायकाळी 4 वाजता वर्धा येथून नागरपूर कउे प्रयाण करतील.
