सावंगी रुग्णालयात जागतिक हृदय दिन साजरा
सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या बालरोगशास्त्र विभागाद्वारे जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे औचित्य साधून बालरोग विभाग प्रमुख डॉ. अमर ताकसांडे व बालरोगतज्ज्ञ डॉ. भारती ताकसांडे लिखित ‘हँडबुक ऑफ बेसिक पेडियाट्रिक इकोकार्डियोग्राफी’ या अभ्यासपूर्ण माहिती पुस्तकाचे प्रकाशन दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे…