सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या बालरोगशास्त्र विभागाद्वारे जागतिक हृदय दिन साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून बालरोग विभाग प्रमुख डॉ. अमर ताकसांडे व बालरोगतज्ज्ञ डॉ. भारती ताकसांडे लिखित ‘हँडबुक ऑफ बेसिक पेडियाट्रिक इकोकार्डियोग्राफी’ या अभ्यासपूर्ण माहिती पुस्तकाचे प्रकाशन दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ललितभूषण वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले.
जागतिक हृदय दिनानिमित्त जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयाच्या बालरोगशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. स्वाती खापेकर यांनी हृदयाच्या काळजीचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. तर, डॉ. सागरिका यांनी या वर्षीच्या मध्यवर्ती संकल्पनेवर संवाद उपस्थितांशी संवाद साधला. या उपक्रमात शिक्षकांसह पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यार्थ्यी सहभागी झाले होते.






