मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावत्या कारने अचानक घेतला पेट; मोठा अनर्थ टळला!

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर धावत्या क्रूझ कारला भीषण आग (mumbai pune expressway car fire) लागल्याची घटना घडली आहे. ही कार पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होती. मात्र कामशेत बोगद्याजवळ कारला अचानक आग लागली. सुदैवाने कारमधील तिघेही सुखरूप आहेत.

कामशेत बोगद्याजवळ दुपारच्या सुमारास ही घटना घडली. कारच्या इंजिनमधून धूर येत असल्याचं लक्षात येताच चालकाने कार थांबवली आणि खाली उतरून नेमकं काय होत आहे, याची पाहणी केली. कार पेट घेत असल्याचं चालकाच्या लक्षात येताच त्याने कारमध्ये असणाऱ्या इतर दोन व्यक्तींनाही बाहेर येण्यास सांगितलं.

काही वेळातच कारने पेट घेतला. या दुर्घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. चालकाने प्रसंगावधान दाखवल्याने सर्वांचे प्राण वाचले असून मोठा अनर्थ टळला आहे.

दरम्यान, या दुर्घटनेनंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळासाठी रोखून धरण्यात आली होती. परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडी झाली. काही वेळानंतर कारला लागलेली आग विझवण्यात यश आलं आणि वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

newtraffictail
Author: newtraffictail

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FOLLOW US

Live Cricket

POll

What does "money" mean to you?
  • Add your answer

TRENDING NEWS

Advertisement

GOLD & SILVER PRICE

Rashifal