वर्धा : वर्धा लोकसभा मतदार संघातील आष्टी व कारंजा येथील रेल्वे आरक्षण केंद्र बंद असलेले आष्टी व कारंजा भागातील नागरीकांनी श्री अमर काळे खासदार यांचे लक्षात आणून देताच श्री अमर काळे यांनी तात्काळ रेल प्रबंधक नागपूर यांच्याशी संपर्क साधला व ही बाब त्यांचे कानावर घातली. लोकांची कशी गैरसोय होत आहे हे त्यांचे लक्षात आणून दिल्याबरोबर रेल्वे विभाग खडबडून जागे झाले व हे आरक्षण केंद्र आठ दिवसात सुरु होईल असे खासदार महोदयांना रेल्वे विभागाकडून सांगण्यात होते.
आर्वी-पुलगाव रेल्वे पूर्वीचे काळी सुरू होती व आर्वी येथे रल्वे स्टेशन होते व तेथूनच आरक्षण पण व्हायचे. सध्या पुलगाव-आर्वी रेल्वे लाईन खासदार श्री अमर काळे यांनी आपल्या सकारात्मक पाठपुराव्यातून ही लाईन ब्रॉडगेज मंजूर झाली असून हीच लाईन आर्वीचे पुढे वरुड पर्यंत वाढविली जाणार आहे.
त्यामुळे पुलगाव ते आमला स्टेशन तसेच आर्वी ते आमला व आमला व पुलगाव हे दोन्ही केंद्रीय दारुगोळा भांडार या लाईनमुळे जोडले जाणार आहे. त्यामुळे आर्वी-आष्टी मोर्शी वरुड या भागातील लोकांना रेल्वेची सुविधा उपलब्ध होणार आहे.
बंद असलेले आष्टी व कारंजा येथील रेल्वे आरक्षण केंद्र सुरु करण्याचा लोकांचा आग्रह लक्षात घेता या बाबींचे गांभिर्य ओळखून खासदार श्री अमर काळे यांनी ही बाब तात्काळ प्रबंधक मध्य रेल्वे नागपूर यांचेशी फोनद्वारे संपर्क केला. लोकांना होणारा त्रास व अडचणी त्यांचे कानावर घातली व रेल्वे आरक्षण केंद्र तात्काळ सुरु करणेबाबत निर्देश दिले होते.
रेल्वे विभागाने खासदार अमर काळे यांच्या मागणीची तात्काळ दखल घेऊन आष्टी व कारंजा येथील मुख्य डाकघर कार्यालयात रेल्वे आरक्षण केंद्र तात्काळ सुरु करण्यात आले. रेल्वे आरक्षणाची सुविधा आष्टी व कारंजा येथील डाकघर कार्यालयात खासदार श्री. अमर काळे यांच्या पाठपुराव्याने तात्काळ सुरु झाल्याने नागरिकांनी खासदार अमर काळे यांचे आभार मानले.






