वर्धा – राष्ट्रीय हातमाग दिवस दिनांक 8/8ला ग्राम सेवा मंडल गोपुरी येते मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला…
2015 पासून दरवर्षी आपल्याकडे 7 ऑगस्ट हा दिवस *राष्ट्रीय हातमाग दिन* कोलकात्याच्या टाऊन हॉलमध्ये मोठ्या जाहीर सभेने स्वदेशी चळवळीची सुरुवात झाली. दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन साजरा केला जातो. 7 ऑगस्ट 2015 रोजी पंतप्रधानांनी या दिवसाची सुरुवात केली होती. तेव्हापासून हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. 7 ऑगस्ट 2024 रोजी दहावा हातमाग दिन साजरा करण्यात येत आहे.
हातमाग दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे हा आहे. या शिवाय विणकरांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने आणि भारताच्या सामाजिक आर्थिक विकासातील त्यांच्या योगदानाचे कौतुक करण्याच्या उद्देशाने हातमाग दिन साजरा केला जातो. हातमागापासून बनवलेल्या वस्तू देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशात पोहोचणे अत्यंत आवश्यक आहे यामुळे भारताला वेगळी ओळख मिळेल तसेच विणकरांना पुढे जाण्याची संधी मिळेल.
हातमाग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कपड्यांपासून घराच्या सजावटी पर्यंत हातमागाचा विशेष समावेश केला जात आहे. मोठ्या संख्येने लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच हातमागामुळे महिलांना स्वावलंबी बनण्याची संधी मिळते.
आज भाजपा महिला मोर्चा वर्धा तालुक्याच्या वतीने या विणकर महिला ज्या भारताची पारंपरिक धरोहर व स्वदेशी चां वारसा पुढे नेत आहेत अशा 14 विणकर महिलांना टिफीन डब्बे देऊन सत्कार करण्यात आला. त्यांचे तोंड गोड करण्यात आले.
विणकर महिलांना अशी कौतुकाची थाप मिळाली त्यामुळे त्या खूप आनंदी झाल्या व आपल्या कामा बद्दल उत्साही झाल्या. भाजपा महिला मोर्चाच्या महिलांनी आपल्या कामाची दखल घेतली याचा त्यांना विशेष अभिमान वाटला. विणकारांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती तसेच महिलांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळेस विणकरांना देण्यात आली.
भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वानिथी अक्का तसेच प्रदेशाध्यक्ष माननीय चित्राताई वाघ यांच्या मार्गदर्शनात तसेच जिल्हाध्यक्ष सौ वैशालीताई जयंत येरावार यांच्या अध्यक्षतेत तालुका अध्यक्ष सौ प्रतिभा वाळके यांनी हॅण्डलूम दिन चा कार्यक्रम ग्राम सेवा मंडळ गोपुरी येथे आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला ग्राम सेवा मंडळाचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले.. त्यांचा वृक्ष देवून सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हा सचिव चेतना कांबळे, तालुका महामंत्री वंदना पाटील, उपाध्यक्ष माधुरी मेंडेवार, निकिता पाटील इत्यादी पदाधिकारी उपस्थित होत्या.