अचानक शैक्षणिक सत्राच्या मध्येच शिक्षकाची बदली झाल्याने हिंगणघाट तालुक्यातील सास्ती येथील विद्यार्थी पालकांसह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर पोहचलेय. राज्य शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यात हा प्रकार घडलाय. शिक्षकांची मधूनच झालेली बदली ही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारी आहे. सास्ती येथील जिल्हा परिषद शाळेची मुख्यमंत्री माझी शाळा उपक्रमात निवड झालेली शाळा असून एज्यूकेशन टूरीझममध्ये देखील ही शाळा निवडल्या गेली आहे. गेल्या दोन वर्षात विकसित केलेल्या शाळेतून शरद ढगे या शिक्षकाची अचानक झालेली बदली पालकांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहेय. सत्राच्या मध्येच बदली करणे नुकसानकारक असल्याने चक्क पालकांनी विद्यार्थी घेऊन उपविभागीय कार्यालय गाठले. हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर ठिय्या मांडून या बदली प्रकरणाचा निषेध केलाय. इयत्ता पाहिली ते सातवी पर्यत असलेल्या या शाळेत एकूण एकसष्ट विद्यार्थी आहेय. वर्ध्याचे पालकमंत्री हे शिक्षण राज्यमंत्री आहेय. आणि त्यांच्याच जिल्ह्यात पालक आणि विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ आलीय. या वेळी मागणीचे निवेदन सुध्दा विद्यार्थ्यानी दिले..
