वैश्विक दर्जाच्या आरोग्यसेवेसाठी मेघे व अदानी एकत्र,वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आरोग्य क्षेत्रात संयुक्त वाटचाल

वर्धा – दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेने अहमदाबाद येथील अदानी फाउंडेशनसोबत सामाजिक बांधिलकी जोपासत जागतिक दर्जाची आरोग्यसेवा, शिक्षण आणि पायाभूत सुविधा देशांतर्गत अधिक कार्यक्षमतेने विकसित करण्याच्या उद्देशाने एकत्रित वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची संयुक्त घोषणा दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेचे विश्वस्त व अभिमत विद्यापीठाचे प्रधान सल्लागार सागर मेघे आणि अदानी समूहाचे संचालक डॉ. मलय महादेविया यांनी केली.


सावंगी मेघे येथे झालेल्या या संयुक्त बैठकीला कुलपती दत्ता मेघे, प्रकुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, मेघे समूहाचे संचालक राघव समीर मेघे, कुलगुरू डॉ. ललित वाघमारे तसेच मेघे व अदानी समूहाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मेघे समूह व अदानी फाउंडेशनमध्ये झालेल्या या करारानुसार दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्थेच्या ध्येयधोरणांना कायम ठेवत दर्जेदार, नाविन्यपूर्ण आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोनाचा समावेश असलेले जागतिक दर्जाचे केंद्र विकसित करण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेषतः प्रगत शिक्षण, संशोधन आणि सर्वसामान्यांसाठी दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी हा सामाजिक करार असण्याचे यावेळी सांगण्यात आले. मेघे समूहासोबत आमची शैक्षणिक व आरोग्य सुविधांसाठी सहभागिता असून कुलपती दत्ता मेघे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रगत वाटचाल पुढेही सुरू राहील, असे डॉ. मलय महादेविया यांनी सांगितले. तर, मेघे शिक्षण व आरोग्य समूहातील सर्व कर्मचारी माझ्या परिवाराचे सदस्य असून मी कायम त्यांच्या सोबत असल्याचा विश्वास यावेळी सागर मेघे यांनी दिला.


पस्तीस वर्षांहून अधिक काळ आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करणारी आमची संस्था अदानी फाउंडेशनसोबत कार्यरत होते आहे, हे प्रादेशिक आणि राष्ट्रीय विकासाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ही युती आगामी काळात सामाजिक दायित्वाच्या भावनेतून सर्वसमावेशक आणि शाश्वत प्रगतीसाठी कार्यरत राहील, अशी आशा कुलपती दत्ता मेघे यांनी व्यक्त केली. तर, या संयुक्त करारप्रसंगी ऑनलाईन पद्धतीने सहभागी होत अदानी फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉ. प्रीती अदानी यांनीही संवाद साधला. मेघे संस्थेसोबत सहकार्याच्या भावनेतून एकत्रित कार्य करताना दर्जेदार आरोग्यसेवा आणि शिक्षण हा एक मूलभूत अधिकार आम्ही मानतो. सर्वांना सन्मानपूर्वक सेवा देणारे एक स्केलेबल मॉडेल तयार करीत विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करण्याचा उद्देश असल्याचे असल्याचे प्रीती अदानी यांनी सांगितले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FOLLOW US

Live Cricket

POll

What does "money" mean to you?
  • Add your answer

TRENDING NEWS

Advertisement

GOLD & SILVER PRICE

Rashifal