अट्टल घरफोडी करणारा हड्डी शेवट स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

वर्धा : स्था.गु.शा., वर्धा कडून पो. स्टे. रामनगर हद्दीतील घरफोडीसह पो.स्टे सावंगी मेघे हद्दीतील मौजा सुकळीबाई बँक ऑफ इंडिया शाखेत चोरीचा प्रयत्न असे दोन गुन्हे उघडकीस आणून आरोपीचे ताब्यातून त्याने गुन्ह्यात वापरलेल्या मोपेड वाहनासह एकूण जु.कि. 2,07,000/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून, सदर आरोपीवर घरफोडी गुन्हा पो.स्टे.वर्धा शहर येथे दाखल होता आणि घरफोडीच्या गुन्ह्यातून आरोपी पसार होता आरोपीवर पोलिस स्टेशन रामनगर येथे गुन्हा नोंद करण्यात आला अपराध क्रमांक
11 /2025कलम 305(1),331(3) 331(4) भारतीय न्याय संहिता चोरीस गेलेला माल 1. पाच ग्राम वजनाची बदामी अंगठी किंमत अंदाजे 40,000/- रु. 2. एक पाच ग्रॅम वजनाची लेडीज अंगठी किंमत अंदाजे 42,000/- रु.3. तीन ग्राम वजनाचे दोन कानातील झुमके किंमत अंदाजे 25,000/-रु.4. चोरी करण्याकरता वापरलेली एक सुझुकी मोपेड गाडी किंमत 1,00,000 असा एकूण जु किं. 2,07,000/- रु.2)अप क्र 874 /24 सावंगी मेघे कलम 305(1) 331(4)62,3(5)BNS चोरीस गेलेला माल* बँक ऑफ इंडिया शाखा सुकळी बाई जि. वर्धा येथील चोरीचा प्रयत्नआरोपी1) हड्डी उर्फ दिलेरसिंग नेपालसिंग बावरी वय.28 वर्ष रा.सावंगी शिख बेडा वर्धा 2) विक्रमसिंग सब्जीतसिंग टाक, रा. सिंक बेडा, सावंगी मेघे वर्धा पो. स्टे. वर्धा शहर 1) अप क्र. 128/2025


कलम 305(1),331(3) 331(4) भारतीय न्याय संहिता 2023 या गुन्ह्यात सदर आरोपी पसार होतगुन्ह्याची हकीकत याप्रमाणे आहे कि, पो. स्टे. रामनगर येथे फिर्यादीचे लेखी रिपोर्ट वरून नमूद कलमाने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल व अज्ञात आरोपीचा शोध घेत असता गुप्त खबरदादाराकडून मिळालेल्या माहितीवरून नमूद आरोपीस मोमीनपुरा, नागपूर येथून ताब्यात घेऊन कसून सखोल चौकशी केली असता त्याने सदरचे गुन्हे केल्याचे कबूल केल्याने वरून नमूद करण्यात आले आहे आणि आरोपी कडून मुद्देमाल जप्त करून सदर गुन्हे उघडकीस करण्यात आलेले आहे.
तसेच सदर आरोपीने यांच्या व्यतिरिक्त मौजा सुकळी बाई येथे बँक ऑफ इंडिया शाखेत त्याचा मित्र विक्रम सिंग टाक, रा. सिंख बेडा, सावंगी मेघे, वर्धा याच्या संगनमताने चोरीचा प्रयत्न केला असल्याबाबत कबुली दिली आहे. तसेच सदर आरोपी हा पो. स्टे. वर्धा शहर येथे दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात पसार होता. सदर आरोपीस जप्त मुद्देमलासह पुढील कारवाई करीता पो.स्टे. रामनगर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई
वर्धा पोलिस अधीक्षक, अनुराग जैन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.विनोद चौधरी, यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हवा. नरेंद्र पाराशर, ना.पो.अं. नितीन इटकरे, सागर भोसले, रितेश शर्मा, पो.अं. संघसेन कांबळे, मिथुन जिचकार, दिपक साठे सर्व स्था.गु.शा. वर्धा तसेच सायबर सेल चे पो.हवा. दिनेश बोथकर यांनी केली आहे…..                               अविनाश नागदेवे जिल्हा प्रतिनिधी वर्धा….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

FOLLOW US

Live Cricket

POll

What does "money" mean to you?
  • Add your answer

TRENDING NEWS

Advertisement

GOLD & SILVER PRICE

Rashifal