ॲड. आशुतोष इंगळे यांचा युक्तिवाद ठरला निर्णायक; शिराळा ग्रामपंचायत सदस्यावर अपात्रतेचे शिक्कामोर्तब
अमरावती जिल्हाधिकारी न्यायालयाचा मोठा निर्णय: ‘लोकप्रतिनिधीने अतिक्रमण करणे हा पदाचा दुरुपयोग’ अमरावती : शिराळा ग्रामपंचायतीमधील गाजलेल्या अतिक्रमण प्रकरणात अपर जिल्हाधिकारी न्यायालयासमोर झालेला कायदेशीर लढा आता तडीस गेला असून, अर्जदाराच्या वतीने ॲड. आशुतोष इंगळे यांनी केलेला सडेतोड युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने महत्वपूर्ण आदेश पारित केला आहे. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून सार्वजनिक रस्ता अडवल्याचा ठपका ठेवत, गैरअर्जदाराविरुद्ध…